खादीमीन हुज्जाज कमिटीच्या पुढाकाराने हज यात्रेकरुंची आरोग्य तपासणी..
औसा, प्रतिनिधी
हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, औसा येथे सोमवार (दि. १४ सप्टेंबर) रोजी मेडिकल स्क्रिनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात औसा शहर व तालुक्यातील सुमारे ४० हज यात्रेकरूंची विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
शिबिरात यात्रेकरूंची ईसीजी, रक्त तपासणी, रक्तदाब (बीपी) यासह आवश्यक प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. संपूर्ण तपासणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व सुरळीतपणे पार पडली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात्रेकरूंच्या तपासणीसाठी विशेष सहकार्य केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खादीमीन हुज्जाज कमिटी, औसा यांच्या वतीने शेख अ. बासिद, मौलाना हारून नाझिम साहेब, शहजान सर, जावेद गुरुजी नगरसेवक, खुंदमीर मुल्ला, हबीबभाई, समिउद्दीन पटेल व अखलाक पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.
हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी वेळेत व व्यवस्थित पूर्ण झाल्याने यात्रेकरूंमध्ये समाधानाचे वातावरण होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल खादीमीन हुज्जाज कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय औसा, प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.






0 टिप्पण्या