सौ मंगलबाई खानापुरे यांचे निधन
औसा प्रतिनिधी
औसा नगर परिषदेच्या माजी सदस्या सौ मंगलबाई अशोक खानापुरे वय 60 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. दिवंगत मंगलबाई खानापुरे या सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक खानापुरे यांच्या पत्नी आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे आणि सहशिक्षक सागर खानापुरे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास औसा येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीसाठी सामाजिक,
शैक्षणिक, राजकीय तसेच उद्योग व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवरासह नातेवाईक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या