तपसे चिंचोली येथे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी

 तपसे चिंचोली येथे क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी 



औसा:

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 

क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती 7 सप्टेंबर  2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शौर्याला, त्यागाला आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला अभिवादन केले.

यावेळी प्रशांत पाटील , राजेश पाटील, विश्वंभर सुरवसे , युवराज यादव , नितीन कवठाळे , बालाजी बिराजदार  , भास्कर खवडे, सुरज मुळे , राजे उमाजी नाईक मित्र मंडळ तपसे चिंचोली व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या