हार हार महादेव, हर हर संभसदाशीव शिवशिव सभासदाशिवं व नीलकंठेश्वराच्या जयघोषाने आसमंत टाळमृदगाच्या ध्वनीत दुमदुमला निलकंठेश्वर याञा महोत्सवाची उत्साहात सांगता

 हार हार महादेव, हर हर संभसदाशीव शिवशिव सभासदाशिवं व नीलकंठेश्वराच्या जयघोषाने आसमंत टाळमृदगाच्या  ध्वनीत दुमदुमला  निलकंठेश्वर याञा महोत्सवाची उत्साहात सांगता 




 



* आकरा दिवसात चार लाख भावीकाने घेतले दर्शन 


किल्लारी- सूर्यकांत बाळापूरे


*सांगता सोहळ्याची सांगता श्री निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या हस्ते .पूजन व महाआरती होऊन पालखी सोहळ्यासची सुरवात  झाली



*पालखी सोहळ्यात २० हजार भावीक सामील होता महिलाचा सहभाग जास्त होता                            *तेरणा नदी तीरावरील नीलकंठेश्वराचा भक्तीयज्ञ याची देही याची डोळा अनुभवव्यासाठी दाखल झालेल्या लाखाच्या संखेत दाखल झालेल्या भावीकानी    हार हार महादेव ,ओमनमशिवाय , हरहर सांब सदाशिव- शिवशिव सांब सदाशिव, निळकंठेश्वर महाराज की जय, एकच गजर केल्याने सारा आसमंत दुमदुमला भक्तीत एकरुप झालेल्या भाविकांनी पालखीसह प्रस्थान ठेवले अन गेली 11 दिवस चाललेल्या नीलकंठेश्वर याञेची दि 8-9-26 मंगळवार रोजी उत्साहात सांगता झाली.     


     भाविकांच्या उत्साहाला उधान आणणा-या नीलकंठेश्वर याञेला दिनांक 29 स्पटेंबर शनीवार पासुन सुरवात झाली  अर्चनाताई चाकुरकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते पूजन होऊन यात्रा मुर्तीची  प्राणप्रतिष्ठापणा होऊन यात्रेस सुरवात झाली  होती.नीलकंठेश्वराच्या भेटीची ओढ लागलेले  लाखोच्या संख्येने मंबई पुणे पासून दुरदुरवरुन व शेजारील कर्नाटक , आंध्र राज्यातील भावीक तीर्थक्षेञी दाखल झाले.अनेकांनी आपले नवस पुर्णकेले. बरेच महिलानी पाच किलोमीटर नवीन किल्लारी ते मंदीर पर्यंत दंडवत घातले हा भक्ती यज्ञ म्हणजे भाविकांनी पर्वणीच !भक्तीत एकरुप झालेल्या भाविकानी.आम्ही जातो अमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा अभंग झाल्यानंतर महाआरती होऊन प्रस्थान ठेवले.                             दिंड्यापत्ताका टाळ मृंदग ढोल ताशाच्या  गजर हार हार महादेवचा भाविकांनी एकच जयघोष केला.त्यामुळे सारा आसमंत दुमदुमला जुने गाव किल्लारी येथुन पालखीसह परिसरातील भाविक पुनर्वसीत गावात दाखल झाले.नीलकंठेश्वर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच  फटाक्याची अतीषबाजी भाविकाकडुन जागोजागी करण्यात आली या वेळी निळकंठेश्वर मंदीर ते नवीन किल्लारी  पाच कि.मी.रस्त्यावर सुबक रागोंळी  इंदीरा कन्या विद्यालयाच्या मुलीनी काढली. हि रांगोळी सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती 




 .गेली आकरा दिवस काकड -आरती हरिजागर ,किर्तन ,भजन प्रवचन असे दैनांदिन कार्यक्रम पार पडले .लहान मुलासाठी रहाट पाळणे,रेल्वे ,झुले,घसरगुडी,आसे अनेक स्टाँल लावण्यात आले होते.आनेकांनी आपआपल्या परिने सेवा देण्यात आली . 



भुकंपानंतर १९९५ पासून जवळ्पास 30 वर्ष पासुन मोफत सेवा किल्लारी पाटी ते मंदीर पर्यंत चालु आहे किल्लारी येथील निळकंठेश्वर यात्रा  मोफत सेवा संघटने तर्फे सुर्यकांत बाळापुरे ,जनार्धन डुमने,बालाजी चव्हाण ,  विक्रम भोसले,,,यांच्या संयोजनाने किल्लारी  व परिसरातील 400 वहानधारकानी जीप, कार, काळी पिवळी टैक्सी, ट्रॅव्हलस, टेम्पो, अँटो आकरा दिवस मोफत सेवा दिली.  प्रदीप कांबळे, गणेश कांबळे, संजय दंडगुले , संतोष दुधभाते,  राजु डुमने, परमेश्वर साखरे दता गावकरे, अनील भोसले, , तानाजी सुर्यवंशी यानी परीश्रम घेतले जिल्हायातील आमदार, खासदार आनेक कॉग्रेस ,राष्ट्रवादी कॉग्रेस ,भाजपा ,शिवसेना चे  राजकीय नेते , आमदार, खासदार व जिल्हाधिकारी व आनेक मुख्य प्रशासकीय आधिकार्यानी महापुजासाठी उपस्थिती लावली 


*यात्रा सांगता वेळी  सोमवारी सकाळी 8ते 12 वाजेपर्यंत हभप संभाजी झरे अनसरवाडा, पांडुरंग गवळी मंगळवेडा, रघुनाथ बिराजदार घोटाळ, बळीराम डब्बे वलांडी यांचा भारुडकाराचा यांचा जंगी भारुडाचा समाजप्रबोधनावर सामना रंगला.



* पालखी मिरवणुक दुपारी 12 -00 वाजता  मंदीरामध्ये श्री निळकंठेश्वर ट्रस्टच्या वतीनेआरती करुन  पालखी सोहळा निघाला वाटेत व्यापारी ,रोडवरील घरासमोर पालखीची पुजा घरासमोर पाण्याच्या सडा रांगोळी ,पुष्पाचा सडा घालुन स्वागत करुन पुजा करीत होती  जुनेकिल्लारी ते पुनर्वसीत किल्लारी 5 कि.मी.टाळ मृदंगाच्या गजरात नवीन किल्लारी येथील   निळकंठेश्वर मंदीरात भजन आरती करून. पाच वाजता सांगता झाली.


* पालखीचे मानकरी  सर्वच गुरव समाजाकडे आसून त्यांच्या ताब्यात आसते गुरव बांधवाने पालखीचे रक्षण करीत सोहळा आनंदात पार पाडला



पालखीसोहळ्या मध्ये 20 हजार भाविक  सामील होते  विशेष म्हणजे महीलाचा सहभाग जास्त होते



* पालखी सोहळा एक किलोमीटर लांबीचा होता त्यामध्ये टाळमृदंगावर नाचणारे भावीक आनंदात तल्लीन होऊन नाचत होते तर महीला,पुरुष फुगडी खेळणे अदी खेळ खेळत होते  



यात्रेकाळात सुत्रसंचलन राजेंन्द्र जळकोटे यानी केले 


,सपोनी महावीर जाधव  यानी बाहेरील 70 पोलीस फोर्स किल्लारीतील 30 पोलीस असे 100 जणाचा बंदोबस्त केला होता 


तर वाहातुक व्यवस्था पि एस आय गोपाळ शिंदे ,  पिएसआय किसन मरडे, एएसआय गणेश यादव  ,मुरली दन्तराव ,DsBचे कृष्णा गायकवाड  , रवी करके, शरद माने, राजपाल साळुंके यानी तर यात्रेतील बंदोबस्त  ट्राफीक पोलीस दत्ता जाधव, एएसआय कांबळे, आकाश सरतापे, पोकॉ चव्हाण, कमाल शेख,, फुकटे कालीदास, महेश पवार, भागवत गंडाळेयानी पार पाडल

सतत ॥ दिवस सकाळ संध्याकाळ महाप्रसादाची सोय भाविकासाठी केली होती

यात्रा व्यवस्थीत पार पाडण्यासाठी बिसरसिंग ठाकुर, , शरण पाटील ,  बाळु गावकरे, संभाजी बाबळसूरे


राजेंद्र जळकोटे, देवीदास मिरकले, आंकुश भोसले,   शरण पाटील पप्पु भोसले,  शिवशंकर  जळकोटे शिवराज जळकोटे, भुजबळ


,प्रशांत गावकरे,,तानाजी चाकुरे,,भारत बोळशेट्टे ,संजय गावकरे,राजु बिराजदार ,श्याम घोरपडे  मल्लीकार्जुन उमाटे, ,देवाचे पहारेकरी  मंडळ यानी परीश्रम घेतले .



*पालखीसोहळा दुपारी 12वाजल्या पासुन 5 वाजेपर्यंत जुने किल्लारी मंदीर ते नवीन किल्लारी निळकंठेश्वर मंदीर 5 किलोमिटर ६ तास चालु होती  पालाखी सोहळा भक्ती रसात नाचत चालु होता निळकंठेश्वर मंदीरात अभंग व आरती होऊन सांगता झाली .


*पालकीसोहळ्यात सोबतच्या भक्ताना रस्यामध्ये जागोजागी बिसलरीपाणी ,चहा ,खिचडी,शिरा ,केळी ची व्यवस्था दानशुर  भाविकाने केली होती.


भजन,किर्तन याचे व्यवस्थापन बाळु महाराज ,ईश्वर मास्तर यानी केले.


देवस्थान ट्रस्टचे आध्यक्ष आशोक गावकरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, चंद्रकात बाबळसुरे, मनोहार गवारे, सुभाष लोव्हार, नामदेव माळवदे, निळकंठ बिराजदार याने यात्रेत सर्व सोई उपलब्ध करून भाविकाची सोय केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या