मारुती महाराज साखर कारखाना 3111 रुपये ऊसाला दर देणार*

 *मारुती महाराज साखर कारखाना 3111 रुपये ऊसाला दर देणार*




लवकरच साखर कारखाना डिस्टलरी प्रकल्प सुरू करणार


कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 


माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती 



लातूर दि. ८.


एकेकाळी मारुती महाराज साखर कारखाना सुरू होईल का नाही अशी परिस्तिती असताना लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा आशीर्वाद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने हा साखर कारखाना सुरू झाला अतिशय पारदर्शक कारभार, काटकसर आर्थिक शिस्त पाळली गेल्याने कारखाना प्रगतीपथावर असून यावर्षी कारखान्याची क्षमता ३१००-३२०० टन क्रेसिंग होईल असे सांगून लवकरच ncdc व जिल्हा बँकेच्या आर्थिक मदतीने डिस्टिलरी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी कारखान्याचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी दिली ते बुधवारी संत शिरोमणि मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते 



यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील  लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक संचालक गणपतराव बाजुळगे सुभाष जाधव , माजी जिल्हा उपाध्यक्ष नारायण लोखंडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष  उदयसिंह देशमुख सचिन दाताळ जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव देशमुख कार्यकारी संचालक सदाशिव बहीर , मिडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, बालाजी बिरादार मारुती महाराज साखर कारखान्याचे  संचालक गणपती बाजुळगे शामराव साळुंखे सुभाष जाधव रमेश वाळके बाबासाहेब गायकवाड भरत माळी गोविंद सोनटक्के विलास काळे संतोष भोसले अनिल पाटील निवेदिता पाटील शुभांगी बिराजदार उपस्थित होते 


*आगामी काळात औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणार*


मारुती महाराज साखर कारखाना प्रगतीकडे वाटचाल करत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचे दर देण्याचा प्रयत्न सुरू आहेत यासाठी केवळ साखर उत्पादन यावर दर जास्तीचा होत नाही तर उपपदार्थ निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत त्यात लवकरच ncdc व जिल्हा बँकेच्या सहकार्याने डिस्टलरी प्रकल्प सुरू होणार आहे आपल्याला राजकारण फक्त निवडणुकीपुरते करायचे इतर दिवस हे समाजकारण करत असल्याने या साखर कारखानदारीमुळे जिल्ह्याचा मोठा विकास झाला रोजगार मिळाला भविष्यात आपल्याला या भागात आर्थिक क्रांती होईल असे कार्य करायचे आहेअसेही ते यावेळी म्हणाले.


*१०० कोटी रुपये पेक्षा अधिक नफा कमावनारी लातूर बँक*


*जिल्हा बँकेला जपण्याची गरज*


राज्यातील अव्वल स्थानी असलेल्या लातूर जिल्हा बँकेचा उल्लेख करत ही बँक देशात पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज वाटप करणारी पहिली ठरली असून  जिल्हा बँकेची लवकरच निवडणूक होणार आहे आपण जपले पाहिजे हि निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे त्यामुळे चुकीचे माणस आले तर आपल्या चांगल्या चालणाऱ्या संस्थांना झळ पोहचेल  याकडे सभासदांनी काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे असे सांगून आगामी गाळप हंगामात मारुती महाराज साखर कारखाना ऊसाला 3111 रुपये दर देण्याची घोषणा केली 



*साखर कारखानदारीत देशात मांजरा परिवाराने लातूर पॅटर्न केला*



बँकेचे चेअरमन धीरज देशमुख यांचे प्रतिपादन 


साखर कारखानदारीत देशात मांजरा परिवारातील लातूर पॅटर्न निर्माण केला असून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शक कारभार करत शेतकऱ्यांना अधिक भाव देऊन आधार देण्याचे कार्य करत उसाची तोड हार्वेस्टरद्वारे, रिकवरी उच्चांक गाळप उच्चांक होऊन उसाला जास्तीचे  दर मिळत आहे त्यामुळे सहकारात राजकारण न करता समाजकारण केले आहे आज देशात मांजरा परिवाराचा लातूर पॅटर्न शुगर इंडस्ट्रीज नाव घेतले जात आहे असे सांगून धीरज देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखाना नफ्यात चालवून अधिक भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून आज मांजरा साखर परिवारात आज सामील झाल्याचे वाटत आहे असे सांगून मारुती महाराज साखर कारखाना संचालक मंडळी यांच्या कार्याचे कौतुक केले 


यावेळी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून  दीपप्रज्वलन करून सर्वसाधारण सभा सुरू झाली यावेळी कार्यकारी संचालक सदाशिव बहीर यांनी सभेचे वाचन केले विविध विषयाला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली 

कार्यक्रमास मारुती महाराज साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ मांजरा परिवारातील संस्थांचे पदाधिकारी  जिल्हा बँक, रेणा, मांजरा, विलास, जागृती शुगर चे संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कार्यक्रमांचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक गणपतराव बाजुळगे यांनी मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या