औसा येथे आज आजिमुश्शान जलसा-ए-सीरतुन्नबी
औसा, दि. 10 सप्टेंबर 2026 :
औसा शहरातील हाशमी चौक, हाशमी मस्जिद येथे आज, गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता भव्य व दिव्य आजिमुश्शान जलसा-ए-सीरतुन्नबी ﷺ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून हजरत मौलाना मुहम्मद अब्दुल कवी साहेब, हैदराबाद तसेच हजरत मौलाना याहया साहेब नोमानी, लखनौ हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या जलशामध्ये हजरत मुहम्मद मुस्तफा ﷺ यांच्या पवित्र जीवनचरित्र, सीरत व त्यांच्या शिकवणीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हजरत मौलाना मुहम्मद अब्दुल कवी साहेब भूषवणार असून, कार्यक्रमाचे आयोजन मजलिसे उलमा, व जमीयते उलमा ए हिंद औसा शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी औसा शहर व तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आजिमुश्शान जलशाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन मौलाना हारून ईशाती साहेब,, यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या