व्हॉइस ऑफ मीडियाच्या औसा तालुकाध्यक्ष पदी विनायक मोरे..

 व्हॉइस ऑफ मीडियाच्या औसा तालुकाध्यक्ष पदी विनायक मोरे..



पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार..



औसा प्रतिनिधी : - पत्रकारिता क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य तसेच काम करत सामाजिक बांधिलकी तसेच संघटनात्मक योगदानाची दखल घेत व्हॉइस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या औसा तालुकाध्यक्ष पदी विनायक मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र संस्थेचे राज्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या स्वाक्षरीने तसेच लातूर जिल्हाध्यक्ष यांच्या सुचनेने (दि. ६ सप्टेंबर २०२६) रविवार रोजी लातूर येथील व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्यालयात  प्रदान करण्यात आले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक उपक्रम राबविणे तसेच व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याची जबाबदारी नवनियुक्त तालुकाध्यक्ष विनायक मोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संस्थेच्या नियमावलीनुसार निश्चित कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, संस्थेची ध्येय-धोरणे, उद्दिष्टे व पत्रकार हिताचे उपक्रम प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे. विनायक मोरे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत असून, पत्रकारांच्या हक्कांसाठी सक्षम व्यासपीठ उभे करण्याबरोबरच औसा तालुक्यात पत्रकार संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या