सेवापूर्ती निमित्त अजमुद्दीन शेख यांचा गौरव
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा : श्री महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी अजमुद्दीन शेख यांच्या सेवापूर्ती निमित्त त्यांचा संस्थेच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष तथा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्था सचिव गिरीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजमुद्दीन शेख यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक व निष्ठावान सेवाकार्याचा गौरव करत त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. माजी आमदार मल्लिनाथ महाराज, स्वर्गीय माधवराव पाटील तसेच नाथ संस्थानचे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्या आशीर्वादामुळे त्यांना श्री कुमारस्वामी महाविद्यालयात सेवा करण्याची संधी लाभली. सेवाकाळात त्यांनी जबाबदारीने व समर्पित भावनेने कर्तव्य पार पाडत महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास नाथ संस्थानचे मच्छिंद्रनाथ महाराज, रवींद्रनाथ महाराज, संचालक अरविंद कुलकर्णी, सुभाष आप्पा मुक्ता, प्रा. एम झेड. आलुरे, विलास जाधव, प्राचार्य डॉ. संजय काळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या