औसा येथे कौमी एकता व हिफाजते खत्म-ए-नुबुव्वत विषयावर भव्य जलसा

 औसा येथे कौमी एकता व हिफाजते खत्म-ए-नुबुव्वत विषयावर भव्य जलसा



औसा, प्रतिनिधी :


 औसा शहरातील लंगरपट्टी कबरस्तान लगतच्या मैदानात रविवार, दिनांक ७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता “कौमी एकता व हिफाजते खत्म-ए-नुबुव्वत (स.)” या विषयावर भव्य धार्मिक जलसा व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख वक्ते म्हणून पंजाबचे शाही इमाम, हजरत मौलाना उस्मान साहेब लुध्यानवी (शेरे पंजाब)  शाही इमाम पंजाब --उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या प्रभावी व विचारप्रवर्तक प्रवचनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.


समाजात बंधुभाव, ऐक्य आणि धार्मिक मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जलशाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक प्रवचन व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मजलिस-उलमा, जमीयत-उलमा, मौलाना हारून इशाअती नाजीम साहेब, वसीम भैय्या खोजन व मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरांतून तयारी सुरू असून हजारो नागरिक उपस्थित राहतील, असा आयोजकांचा विश्वास आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या