*मोमीन गल्ली मशिदीत दुहेरी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; हावरे आणि हन्नुरे परिवाराशी करपुडे कुटुंबियांचे नवे नाते*

 # **मोमीन गल्ली मशिदीत दुहेरी विवाह सोहळा उत्साहात संपन्न; हावरे आणि हन्नुरे परिवाराशी करपुडे कुटुंबियांचे नवे नाते*





*

### **जब्बार करपुडे यांच्या दोन कन्यांचा विवाह सोहळा; नातेवाईक व मान्यवरांची मोठी उपस्थिती**

**औसा (प्रतिनिधी) :**

शहरातील मेहेदवी नगर भागातील मोमीन गल्ली येथील मस्जिद मध्ये  आज दिनांक 7 जून  2026 रविवार रोजी एक अनोखा आणि मंगलमय दुहेरी विवाह सोहळा अत्यंत आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.औसा  येथील मोटारसायकल चे प्रसिद्ध मेकॅनिकल जब्बार गफ्फार  करपुडे यांच्या दोन कन्यांचा विवाह औसा आणि परंडा येथील वरांशी एकाच मांडवात अत्यंत थाटामाटात पार पडला.

या विवाह सोहळ्यात जब्बार करपुडे यांच्या एका कन्येचा विवाह औसा येथील जाफर हावरे यांचे चिरंजीव **कामरान हावरे** यांच्याशी, तर दुसऱ्या कन्येचा विवाह परंडा येथील दादाभाई हन्नुरे यांचे चिरंजीव **खुंदमिर हन्नुरे** यांच्याशी अत्यंत थाटात संपन्न झाला.

पारंपरिक धार्मिक विधी आणि कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला औसा व परंडा येथिल व औसा शहरासह परिसरातील नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मशिदीच्या पवित्र वातावरणात निकाह संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन्ही नवदाम्पत्यांना शुभआशीर्वाद दिले. त्यांच्या भावी सुखी, समृद्ध आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी उपस्थितांनी मनापासून प्रार्थना (दुआ) केली. करपुडे, हावरे आणि हन्नुरे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करून आभार मानण्यात आले. या दुहेरी विवाह सोहळ्याची सध्या मेहेदवी नगर आणि मोमीन गल्ली परिसरात आनंदाने चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या