औशात कामरान हावरे यांच्या वलीमा सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

 औशात कामरान हावरे यांच्या वलीमा सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद





औसा, दि. ८ जून : औसा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील मोमीन गल्ली येथील रहिवासी जाफर हावरे यांचे चिरंजीव कामरान हावरे यांच्या विवाहानिमित्त आयोजित करण्यात आलेला वलीमा (रिसेप्शन) सोहळा सोमवारी (दि. ८ जून) मोमीन गल्ली येथील सय्यद आलम हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


या सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमस्थळी आकर्षक सजावट करण्यात आली होती. उपस्थितांचे आदरातिथ्य आणि उत्तम नियोजन यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली.


नवदांपत्याच्या सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आपुलकी, स्नेह आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविणारा हा वलीमा सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या