औसा येथे अंगणवाडींच्या वतीने वेलकम मेळावा उत्साहात
औसा प्रतिनिधी
औसा : येथील भिमनगर समाज मंदिरात बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा लातूर अंतर्गत कार्यरत सहा अंगणवाड्यांच्या वतीने ‘वेलकम मेळावा’, ‘आधारशिला’ व ‘नवचेतना’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी निपाणीकर साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून मगरपरिषद सीईओ मंगेश शिंदे, डॉ. देवणीकर, समस्येविदास शांताबाई कसबे, डॉ. सोमवंशी, सिस्टर मीना काळे, फुटाणे मॅडम, मुख्यसेविका जाधव मॅडम, पवार मॅडम व कुलकर्णी मॅडम उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. अंगणवाडीच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्ती गिरिजाबाई डांगे व अनिल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सर्वांगीण विकासाचे टप्पे, भविष्याचे झाड, फळे-भाजीपाला तसेच पौष्टिक आहाराचे विविध स्टॉल मांडण्यात आले होते. या उपक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यसेविका जाधव मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन सुमिता गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोमल गायकवाड यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायफळे शांता, घोगरे मंजुषा, शेष मॅडम, कांबळे बिलावती, कांबळे निशा, रसाळ अलका, कसबे स्वाती, कांबळे सरस्वती, शाहू कुंटे, आंबी अपूर्वा, ढवळे आदींनी परिश्रम घेतले. तसेच बालाजी बनसोडे, नेताजी बनसोडे, अमोल सूर्यवंशी, सुभेद कांबळे व आशिष गायकवाड यांनी सहकार्य केले.

0 टिप्पण्या