द.रिंगण लाईव्हचा चौथा वर्धापनदिन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रिंगण गौरव सोहळ्याचे आयोजन ..
औसा प्रतिनिधी
द रिंगण लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून मुख्य संपादक राजू पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक कृषी तसेच आरोग्य क्षेत्रातील संपूर्ण घडामोडीचा रोखठोक आढावा घेत अवघ्या चार वर्षांमध्ये लोकप्रियतेचे उत्तुंग शिखर गाठले आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून समाजातील विघातक प्रवृत्तीवर प्रहार करीत द रिंगण लाईव्ह चे वार्तांकन होत असल्यामुळे दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत रिंगण लाईव्ह च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त रिंगण जीवनगौरव व रिंगण गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2026 रोजी दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते तसेच विधान परिषद सदस्य बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे याप्रसंगी खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे अमित देशमुख ,माजी मंत्री आ .संभाजी पाटील निलंगेकर, आ.विक्रम काळे आ. अभिमन्यू पवार,आ. रमेश कराड ,माजी मंत्री आ. संजय बनसोडे माजी आमदार धीरज देशमुख, विलास लांडे पिंपरी चिंचवड, लातूर चे जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सौ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, भाजपाचे शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर ,संतोष सोमवंशी, मंजुषा निंबाळकर ,आणि संतोष नागरगोजे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक तथा मुख्य संपादक राजू पाटील व स्वागताध्यक्ष अमृत गिरीश पाटील यांनी केले आहे.

0 टिप्पण्या