मदत कधी व किती हे जाहीर करा
घोषणेचा पाऊस नको ; अमलबजावणी कधी
युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे बांधावर
औसा(सा.वा)दि. 26
युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या पिकाची पहाणी केली असून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व तुम्ही घाबरून जाऊन आपल्या जिवाचे कांही बरे वाईट करून घे ऊ नका शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असा येथील शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
शासनाने जीआर काढलेला असून कोणत्या तालुक्याला किती मदत देणार आणि काय देणार हे अगोदर मुख्यमंत्र्यांनी मीडियासमोर येऊन जाहीर करावे तरच या काढलेल्या जीआर ला महत्व असेल अन्यथा त्या जीआरला कसल्याही प्रकारचे महत्त्व राहणार नाही असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने या भागात शेतकऱ्यांची अत्यंत दैनीय अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झालेली असून
पावसा अभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता मावळली आहे. सतत निसर्गाच्या संकटात सापडणाऱ्या औसा तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया पसरली असून सत्ताधारी फक्त घोषणा करत आहेत. सध्या या भागातील शेतकऱ्यांना तातडीच्या
उपायोजना सुरू होणे गरजेचे असताना देखील हे सरकार केवळ वेळ काढूपणा करीत असून काढलेला जीआर हा फसवा असू शकतो त्यामुळे जीआर मध्ये कोणती व कशी मदत देणार याचा उल्लेख नसल्याने मुख्यमंत्र्यांनी यावरती तात्काळ मीडियासमोर येऊन सविस्तर असा नव्याने जीआर काढण्यात यावा व शेतकऱ्यांची होणारी अडचण तात्काळ दूर करावी येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे पाप सरकार करीत आहे.
भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कोणताही घटक सुखी व समाधानी नसल्याची खंत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली असून सरकार केवळ घोषणाबाजी देण्यातच मग्न असून दिलेल्या घोषणांची अगोदर पूर्तता होते की नाही हे देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. अशा दगाबाज सरकारला वटनीवर आणण्याचे काम आपणाला येणाऱ्या काळात करावे लागणार असून त्यासाठी शिवसेना,युवा सेना चे पदाधिकारी आजी माझी कार्यकर्ते यांनी आप- आसातील मतभेद बाजूला ठेवून आत्तापासूनच कामाला लागावे आणि या भाजपाचा खरा मुखवटा सर्वसामान्य मतदारापर्यंत आणण्याचे कार्यही युवा सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी करून दाखवावे.असे आवाहन यावेळी युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले आहे.
औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी युवा सेना प्रमुख अदित्य ठाकरे हे शनिवार दिनांक. 26 सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील तावशी ताड येथे आले होते त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
यावेळी औसा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक तसेच युवा सेना प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती अंबादास दानवे उमरगा मतदार संघाचे आमदार प्रवीण स्वामी धाराशिव मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील संपर्कप्रमुख परमेश्वर सातपुते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, बजरंग जाधव, शिवराज मुळगावकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका जयश्री उटगे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, आकाश माने सोशल मीडिया प्रमुख विशाल पवार, शहर प्रमुख सुरेश भूरे इत्यादी जण यावेळी शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर युवा सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*पळकुटे मुख्यमंत्री*
या भागात परवाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्ताची पाहणी करण्यासाठी आले असता येथील शेतकरी बांधव रोड वरती येऊन मोठ्या प्रमाणात थांबले असल्याचे आत्ताच मला येथील कार्यकर्त्यांनी सांगितले असून मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी क्षणभर ही या ठिकाणी थांबलेले नाहीत अशा मुख्यमंत्र्यांना पळकुटे मुख्यमंत्री म्हणावे लागेल.
*शेतकरी महिलांशी साधला संवाद*
या ठिकाणी महिला शेतकरी वर्गांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होते असल्याने युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथील उपस्थित महिलांची संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना शिवसेना आणि युवा सेना या पाठीशी खंबीरपणे उभी आहे घाबरून जाऊ नका असा सल्लाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी महिलांना दिला.
*उपोषण स्थळास भेट*
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेले युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सुरू असलेले उपोषण स्थळास भेट दिली असून शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा प्रकारचा उपोषणकर्त्याला धीर दिला.







0 टिप्पण्या