मुस्लिम वेलफेअर असोसिएशन प्रदेश सचिवपदी अली मोहम्मद तर मराठवाडा प्रमुखपदी अब्दुल समद शेख यांची निवड
लातुर - मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी उपक्रमांना चालना देण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्याची दखल घेऊन मा. सलीम सारंग राष्ट्रीय अध्यक्ष अजमत खान
महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रा. डॉ. रिझवान खान
महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम वेलफेअर असोसिएशन प्रदेश सचिवपदी अली मोहम्मद तर मराठवाडा प्रमुखपदी अब्दुल समद शेख यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय घेऊन नियुक्ती पत्राद्वारे कळविण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात मुस्लिम वेलफेयर कार्यरत असुन राज्यात सामाजिक उपक्रम, संघटन वाढ व मुस्लिम समाजाचा विकास हा असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे. तसेच समाजातील गरजू घटकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शैक्षणिक प्रगती, युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, समाजहिताच्या विविध विषयांना वेळोवेळी न्याय व हक्कासाठी मुस्लिम वेलफेअर असोसिएशन सक्रिय होणार आहे.निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या