विठ्ठल साई साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सभा संपन्न; ३ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
मुरूम :
येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी देशाचे माजी गृहमंत्री स्व. शिवराज पाटील चाकूरकर व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे चेअरमन आमदार बसवराज पाटील यांनी सांगितले की, यंदा कार्यक्षेत्रात पाऊस अत्यल्प झाला असून १८,२६९ हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. आगामी २०२६-२७ च्या हंगामात किमान ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून कारखाना संपूर्ण ऊस गाळपासाठी कटिबद्ध आहे. लवकरच बॉयलर प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ होईल. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. विषय पत्रिकेचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती:
सभेला व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, धाराशिव DCC बँकेचे चेअरमन व मुरूमचे नगराध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, संचालक केशवराव पवार, दिलीप भालेराव, संगमेश्वर घाळे, शरणप्पा पत्रिके, राजीव हेबळे, दत्तू भालेराव, अॅड. संजय बिराजदार, मंगलताई गरड, इरम्माताई स्वामी, रोहिणीताई पाटील, संतराम बिराजदार, शिवलिंग माळी, अॅड. विरसंगप्पा आळंगे तसेच प्रकाश आष्टे, विजयकुमार सोनवणे, प्रा. शौकत पटेल, माजी प्राचार्य दिलीप गरूड, भरत मारेकर, रुफिक तांबोळी, मल्लीनाथ दंडगे, दत्तात्रय पाटील, प्राचार्य श्रीराम पेठकर, प्राचार्य सी. टी. बिराजदार, बुद्धीवंत साखरे, मदन पाटील, प्रदीप दिंडेगावे, दीपक मुळे, सिद्धाराम कवठे, प्रतापराव पाटील आदी मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले, तर आभार संचालक विठ्ठलराव बदोले यांनी मानले.




0 टिप्पण्या