विना परवाना बनवलेले गतिरोधक चुकविण्याच्या प्रयत्नात कार-पिकअपची भीषण धडक; औसा येथील दोघे जखमी;जखमीस लातूरला हलवले : एकाची प्रकृती चिंताजनक
औसा प्रतिनिधी
औसा:औसा-भादा-मुरुड 239 राज्य मार्गावरील सत्तरधरवाडी पाटीजवळ विना परवाना,गैर मार्गाने बनविलेल्या चुकीचा गतिरोधक चुकवण्याच्या नादात कार (एम.एच. ०३ बी.डब्लू ७६७९) आणि पशू वाहतूक करणारे पिकअप टेम्पो (एम.एच. २४ ए. यू. ८६५०) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कार चालकासह पिकअपमधील दोघे जखमी झाले असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
वाहनांची धडक इतकी भीषण होती की, पिकअप रस्त्यावरच पलटी झाला, तर कार बाजूच्या खड्यात जाऊन 2 -3वेळा उलटली. यात कारची एक बाजू चक्काचूर झाली आहे.अपघातात कार चालक शहाजी नारायण गाढवे (वय ४६, रा. औसा) यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना औशातील रुग्णालयात प्रथमोपचारानंतर लातूरला हलविले. तर पिकअप मधील जिशान इस्माईल शेख (वय १९) आणि त्यांच्यासोबतचा साथीदार छातीत मुका मार लागल्याने जखमी झाला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेची नोंद औसा पोलिसात झाली नसल्याचे समजते.
१२ किमीच्या मार्गावर आहेत २० गतिरोधक !
'खादी ग्रामोद्योग'पासून भादा गावापर्यंत अवघ्या १२ किमीच्या टप्प्यात जवळपास १५ गतिरोधक असल्याने हा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे.याबाबत सार्वजनिक विभागाला माहिती असूनही या बाबीकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
( )*दोन्ही वाहनाकडून हे गतिरोधक चुकवण्याच्या प्रयत्नातच हा अपघात सामोरा समोर घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत औसा पोलिसांत आपघाताबाबत कोणतीही नोंद झाली नसून, दोन्ही वाहने घटनास्थळीच त्या रात्री उशिरापर्यंत पडून होती असे समजते.*
(. ) *भादेकर भूमिपुत्र सोमनाथ बनसोडे,विलास गायकवाड पेंटर यांनी स्व खर्चातून भादा गावातील दोन गतीरोधकाना सफेद कलर देवून आपघात कसे टाळता येतील हा प्रयत्न केला आहे...पण प्राशन कुंभकरण झोपेत असल्याचे दिसतेय....*

0 टिप्पण्या