*औशातील चार गुणवंतांचा हनुमान मंदिरात सत्कार; ज्ञान पंढरी ग्रुपचा अभिनव उपक्रम*
*औसा (प्रतिनिधी):* ज्ञान पंढरी ग्रुप, औसा यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या चार गुणवंत तरुण-तरुणींचा सत्कार सोहळा आज दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी शनिवारी सायंकाळी 7 वाजता औसा येथील हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात
1) *कु. शुभदा संजय पवार* यांची DCC बँक, औसा येथे निवड झाल्याबद्दल,
2) *श्री अनिकेत नरेश पांचाळ* यांची माध्यमिक शिक्षक म्हणून पुणे येथे निवड झाल्याबद्दल,
3) *सौ. विजया माला परिहार* यांची माध्यमिक शिक्षक म्हणून अमरावती येथे निवड झाल्याबद्दल,
4) *श्री ढोले अजित प्रभाकर* यांची रयत शिक्षण संस्था, सातारा येथे माध्यमिक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल
त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आज शनिवार असल्याने हनुमान मंदिरात विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते. आरतीचा मान *श्री संतोष गवळी सर* यांना देण्यात आला. मंदिर परिसर झेंडूच्या फुलांनी व दिव्यांच्या रोषणाईने सजवण्यात आला होता.
यावेळी ज्ञान पंढरी ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानू पंढरी ग्रुप चे सचिव श्री संजय भोसले यांनी केले.
*गुणवंतांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले. ग्रुपचे अध्यक्ष श्री संजय रोडगे म्हणाले की, "औसा तालुक्यातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात मिळवलेले यश हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे. अशा गुणवंतांचा सत्कार केल्याने इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते*."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री मारुती सूर्यवंशी सर व आभार प्रदर्शन श्री काकासाहेब सगर सर ज्ञान पंढरी ग्रुपच्या वतीने करण्यात आले*. कार्यक्रमास ज्ञान पंढरी ग्रुपचे सदस्य ,पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या