बेमुदत अन्त्याग आंदोलन जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पुढा-याकडून बेदखल;नायब तहसीलदारां च्या मध्यस्तीने घेतली माघार

 बेमुदत अन्त्याग आंदोलन जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पुढा-याकडून बेदखल;नायब तहसीलदारां च्या मध्यस्तीने घेतली माघार


...

औसा: औसा तालुक्यातील भादा येथे भादेकर भूमिपुत्र यांचे बेमुदत अण्णत्याग उपोषण दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सुरू करण्यात आले पूर्वी प्रशासनास आणि मुख्यमंत्री यांना निवेदने देऊन उपोषण सुरू करण्यात आले होते..

तीन माजी ग्राम पंचायत सदस्य तथा भादेकर भूमिपुत्र यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी जिल्हा प्रशासन यांना लेखी निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.यावर जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही यामुळे परत एकदा दिं 14 ऑगस्ट 2026 रोजी  सुधारित निवेदन जिल्हा प्रशासन आणि  मुख्यमंत्री यांना देण्यात आले आणि विविध विभागाच्या 18 मागण्यांची पूर्तता करण्याबाबत विनंती करण्यात आली परंतु या निवेदनासही कोणतीही शासनाकडून अधिकृतरित्या त्या निवेदनाची दखल घेत कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजले पडून हे बेमुदत  अन्नत्याग उपोषणास बसण्याची वेळ या तीनही माजी ग्रामपंचायत सदस्यावर आली आणि त्यांनी हे अन्नत्याग उपोषण सुरू केले. यादरम्यान भादा तालुका औसा येथील स्थानिक विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी भेट दिली नाही दररोज उपोषण स्थळाच्या चहूबाजूने चकरा मारल्या परंतु त्यांनी उपोषण स्थळाकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली तर सदरील आंदोलकांचा हेतू हा शेतकरी हित आणि इतरही शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडीअडचणी नागरिकांच्या अडीअडचणी यांच्या संबंधित मागण्या असल्याने सर्वसामान्य नागरिक यांनी दिवसभराकरिता आंदोलन स्थळी रीघ लावून गाठीभेटी ठेवण्यात आले होते. तर अण्णत्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी मेडिकल ऑफिसर यांनी तपासणी करून उपोषणकर्त्यांच्या शरीरातील आवश्यक आणि योग्य असणारी कार्यक्षमताही कमी झाल्याचे सांगण्यात आले होते तरीही तिसरा दिवस पूर्ण करून चौथ्या दिवशी तीन वाजेपर्यंत या उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू ठेवले परंतु तहसील प्रशासनाकडून या उपोषणाची दखल घेत आपण सर्व मागणीबाबत शासन स्तरावर कळविले असून यापुढेही या मागणीची दखल घेत शासनाकडून सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करू असे उपोषण स्थळे येऊन औसा तहसीलचे नायब तहसीलदार पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सामंजस्यपणाने बोलणे केली या बोलण्याचे फलित म्हणून उपोषण करते उपोषण स्थगित करण्यास तयार झाले सर्व चर्चा झाल्यानंतरच हे उपोषण अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले आणि यानंतर या सर्व मागण्या या शासन दरबारी चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करून मागण्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यकतेवेळी गावकऱ्यांनी ही सहकार्य करावे असे यावेळी नागरिकाकडून एकमुखी निर्णय घेण्यात आला आणि चार दिवसाच्या दिवस चाललेले अन्न त्या आंदोलन उपोषण दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी तीन वाजता नायब तहसीलदार यांच्या हाताने लिंबू शरबत प्राशन करून हे अन्नत्याग उपोषण सहभागी असलेले अमोल पाटील रेवन गायकवाड सूर्यकांत उबाळे यांनी एकत्रितरित्या अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात आले असल्याचे जाहीर केले... यावेळी भादा येथील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या