औसा पत्रकार मित्रांकडून राम कांबळे यांचा वाढदिवस साजरा..
शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार
औसा, प्रतिनिधी :
औसा येथील दैनिक मनोगत चे कार्यकारी संपादक व जेष्ठ पत्रकार रामभाऊ कांबळे यांचा वाढदिवस औसा पत्रकार संघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रामभाऊ कांबळे यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला औसा पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगरे, माजी अध्यक्ष संजीव सगरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश दुरुगकर, बालाजी शिंदे, इलियास चौधरी, एस. एस. काझी, गिरिधर जंगाले,दादा बिसेनी यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी रामभाऊ कांबळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. कार्यक्रमात मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारांमधील एकोपा अधोरेखित झाला. सत्कारानंतर उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आयोजन औसा पत्रकार मित्रांच्या वतीने करण्यात आले होते.






0 टिप्पण्या