लातूर जिल्ह्यात वक्फ बोर्डाकडून मुस्लिम विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुरू करा; औसा एआयएमआयएमची मागणी...
औसा प्रतिनिधी : - इतर राज्यांप्रमाणे लातूर जिल्ह्यातही मुस्लिम समाजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी व सध्या मुस्लिम समाजातील बहुसंख्य समाज बांधवांची लग्न सोहळे होत आहेत, त्याची दप्तरी नोंद होत नाहीत. त्या विवाहाची कायदेशीर नोंदणी घेऊन जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी कार्यालयामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे सुरू करण्यात यावे
अशी मागणी औसा ऑल इंडिया मजलिस - ए - इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या वतीने जिल्हा वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी कार्यालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स गंजगोलाई, लातूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील अनेक विवाहित जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राच्या अभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इतर राज्यांमध्ये मुस्लिम विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध असून त्याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातही विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, आजपर्यंत झालेल्या विवाहांचे सियानामा आधारावर नोंद घेऊन संबंधितांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील मुस्लिम समाजाला होणारी गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा वक्फ बोर्ड कार्यालयामार्फत तत्काळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर तालुकाध्यक्ष ॲड. गफरुल्ला हाशमी, शहराध्यक्ष सय्यद कलीम, सय्यद जमीरोद्दीन, देशमुख शकील, सदस्य सय्यद मुजीब व पठाण गफूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

0 टिप्पण्या