*कॉक्सिट महाविद्यालयात आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न*
माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ऋतुजा सगरे चा सत्कार
औसा प्रतिनिधी -रॉयल एज्युकेशन सोसायटी संचलित संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट), लातूर येथे विविध नामांकित आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुवारी दि. २९ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. डॉ. एम. आर. पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. आ. संजयजी बनसोडे साहेब उपस्थित होते. सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. एल. एम. पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी आणि टी.पी.ओ. श्री. के. आर. जाधव हे प्रमुख उपस्थितीत होते.
सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. एम. आर. पाटील यांचा सत्कार डॉ. आर. एस. अवस्थी यांच्या हस्ते, माजी मंत्री संजय बनसोडे यांचा सत्कार डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. टी.पी.ओ. श्री. के. आर. जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. आर. एस. अवस्थी यांनी स्वागतोपर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरला तो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. यावेळी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विविध आयटी कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा माजी मंत्री संजय बनसोडे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री संजय बनसोडे म्हणाले, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयटी क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे, ही अभिमानाची बाब आहे. कठोर परिश्रम आणि तंत्रज्ञानाची कास धरल्यास यश निश्चित आहे. लातूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन."
अध्यक्षीय समारोपात आ. डॉ. एम. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट विभागाचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. ते म्हणाले, "विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. यापुढेही १००% प्लेसमेंटसाठी आम्ही प्रयत्नशील राहू."
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एस. बी. मुंडे यांनी केले. या सत्कार समारंभाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या