औशात जगद्गुरुच्या उपस्थितीमध्ये निघणार ग्रंथ दिंडी ; अधिकमासचे औचित्य साधून सहस्त्रजंगम भोजन सोहळा ...
औसा प्रतिनिधी : - औसा येथील सद्गुरु श्री विरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने अधिकमासाचे औचित्य साधून (दि. 20 मे) बुधवार रोजी औसा येथे जगद्गुरुंच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी काशी जगद्गुरुचे पाद्यपूजन ग्रंथ प्रकाशन आशीर्वचन दर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तर (दि. 21 मे) गुरुवार रोजी सहस्त्रजंगम भोजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या रथोत्सव व ग्रंथ दिंडी सोहळ्यात औसा शहर व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी औसा येथील नाथ मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. सद्गुरु श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हभप गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी श्रीक्षेत्र काशी, श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी श्री क्षेत्र काशी यांच्या सानिध्यात श्री ष. ब्र. डॉ शांतविरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा श्री ष. ब्र. शंभूलिंग शिवाचार्य महाराज आंबेजोगाई, सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये (दि. 20 मे) बुधवार रोजी सायंकाळी 06 : 00 वाजता हनुमान मंदिर औसा ते श्रीक्षेत्र गोपाळपूर पर्यंत रथोत्सव आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आलेली आहे. या ग्रंथदिंडीनंतर ग्रंथ प्रकाशन आशीर्वचन दर्शन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वच समाजातील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी मंत्री तथा मा आ. बसवराज पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ.प्रवीण स्वामी, विभागीय आयुक्त जी श्रीकांत महाबीज अकोलाचे एमडी, दिलीप स्वामी माजी पाटबंधारे सचिव, व्यंकटराव गायकवाड एम. एम. आर. डी. ए. मुंबईचे सचिव प्रशांत औटी सोलापूरचे अनिल सर्जे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या विविध कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे.





0 टिप्पण्या