महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या पदावर औसाच्या सुपुत्राची निवड

 महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या पदावर औसाच्या सुपुत्राची निवड







प्रशांतजी औटी यांची MMRDA मध्ये सचिव तथा अभियांत्रिकी प्रमुखपदी नियुक्ती ; २४ मे रोजी भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन




औसा प्रतिनिधी : - औसा शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला अभिमान वाटावा अशी गौरवास्पद घटना घडली असून, श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा औशाचे सुपुत्र श्री. प्रशांतजी शांतीरप्पा औटी यांची महाराष्ट्र शासनाने सचिव तथा अभियांत्रिकी प्रमुख(MMRDA),  मुंबई या अत्यंत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समस्त औसेकरांच्या वतीने भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ व औसा मुक्तेश्वर देवालय न्यायस समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली असून हा गौरव सोहळा  (दि. २४ मे) रविवार रोजी सायंकाळी ०६ : ०० वाजता श्री मुक्तेश्वर विद्यालय, औसा (जुने बस स्टॅण्ड शेजारी) येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औसा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिमन्यू पवार यांची उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लातूर लोकसभेचे खासदार  डॉ.  शिवाजीराव काळगे, माजी मंत्री तथा भाजपा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. आ. बसवराजजी पाटील आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, औसा आणि श्री मुक्तेश्वर देवालय न्यास, औसा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.औसा शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा शांतीरप्पा औटी, सचिव रविशंकर अप्पा राचट्टे, रवींद्र कारंजे, मुक्तेश्वर देवालय न्यायस समितीने अध्यक्ष ॲड मुक्तेश्वर वागदरे, वाघमारे, धनंजय कोपरे, प्रा युवराज हालकुडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या