एस.आय.आर. 2026 प्रक्रियेसाठी नगर परिषदेकडून जनजागृतीची मागणी .

 एस.आय.आर. 2026 प्रक्रियेसाठी नगर परिषदेकडून जनजागृतीची मागणी




मतदार नोंदणी मॅपिंगबाबत नागरिकांमध्ये जागरूकता कमी – तातडीने उपाययोजनांची गरज

औसा प्रतिनिधी 

औसा, दि. 18 मे 2026 :

एस.आय.आर. 2026 प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील नावांचे मॅपिंग करण्याचे काम सध्या बि.एल.ओ. (Booth Level Officer) मार्फत सुरू आहे. मात्र या प्रक्रियेबाबत अनेक नागरिकांमध्ये पुरेशी माहिती नसल्यामुळे मॅपिंग कामात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.


विशेषतः 2002 च्या मतदार यादीतील नाव व सध्याच्या नावाचे मॅपिंग करताना नागरिकांमध्ये उत्साह कमी असल्याचे दिसून येत आहे. तसेच नविन मतदारांना त्यांच्या नातेवाईकांशी जोडून मॅपिंग करण्यामध्येही विविध अडचणी निर्माण होत आहेत.


या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी नगर परिषदेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार, तसेच घंटागाडीवर भोंग्याद्वारे माहिती प्रसारित करणे आणि इतर उपलब्ध साधनांचा वापर करून एस.आय.आर. प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवावी, अशी  मागणी शेख मुजम्मील महंमदसाब व उमर गुलामहुसेन पंजेशा यांनी  औसा नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या