श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चित्रकला बक्षीस वितरण समारंभ संपन्न..
औसा प्रतिनिधी
औसा : येथील श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या माजी विद्यार्थिनी व नूतन नगरसेविका सौ. ऐश्वर्या पवनराज राचट्टे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सौ. अश्विनी स्वामी, बसेच मातापालक व नूतन नगरसेविका श्रीमती आसिफुनिस्सा खुंदमीर मुल्ला यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बालविवाह न करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले व त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. माशाळे डी. एस. यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये विविध स्पर्धा, उपक्रम राबविले जातात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ प्रत्येकाने ३ जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर एक पणती लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले. शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या बाल चित्रकला स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आपले जीवन उज्ज्वल करावे व विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कला जोपासाव्यात, असे मार्गदर्शन नूतन नगरसेविका सौ. ऐश्वर्या राचट्टे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील टी. एल. व श्रीमती वर्मा पी. बी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती पाटील एच. एल. यांनी केले. यावेळी पालक व मातापालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या