शून्यातून उभा राहिलेला विकासाचा नंदादीप : ॲड. व्यंकटराव गुंड

 शून्यातून उभा राहिलेला विकासाचा नंदादीप : ॲड. व्यंकटराव गुंड





धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले ॲड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रगतिशील शेती व वकिली व्यवसायाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवत त्यांनी समाजकार्यात भरीव योगदान दिले.


मातोश्रींच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या रूपामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक व महिला बचत गटांना आर्थिक आधार मिळाला. आज या संस्थेने ठेवीदारांचा विश्वास संपादन करत मोठी आर्थिक उलाढाल साधली आहे.


तेरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन उभारलेले साखर कारखाने तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील कारखान्यामुळे शेकडो कुटुंबांना रोजगार मिळाला. रूपामाता दूध डेअरीद्वारे दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यात आली.


शेतमाल तारण योजनेद्वारे अल्प व्याजदरात कर्जपुरवठा करत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शून्यातून विश्व उभारण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीमुळे रूपामाता उद्योग समूहाने धाराशिव व लातूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.


५ जानेवारी रोजी ॲड. व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस असून, त्यांच्या सामाजिक व औद्योगिक कार्याला सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या