हिरेमठ संस्थानच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले शांतवीर शिवाचार्य महाराजांचे आशीर्वाद..

 हिरेमठ संस्थानच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले शांतवीर शिवाचार्य महाराजांचे आशीर्वाद..


औसा प्रतिनिधी 

हिरेमठ संस्थानच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर श्री. शांतवीर शिवाचार्य महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महाराजांनी उपस्थितांना शुभाशीर्वाद देत सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, राम कांबळे, विवेक देशपांडे, विनायक मोरे, गिरीधर जंगले, बालाजी उबाळे, विठ्ठल पांचाळ, पाशाभाई शेख, बालाजी शिंदे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


हिरेमठ संस्थानच्या ८६ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवामुळे भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या