हिरेमठ संस्थानात उज्जैन जगद्गुरूंच्या सानिध्यात आज पासून धर्मसभा...
औसा प्रतिनिधी : - औसा येथील हिरेमठ संस्थांच्या 86 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त संस्थांचे मार्गदर्शक डॉ. शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिठाधीपती बाल तपस्वी गुरू निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली श्रीक्षेत्र उज्जैन पिठाचे श्रीमद जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आज पासून म्हणजे दि. ०८, ०९ आणि १० ऑगस्ट रोजी शिष्य गणाला धर्मसभेच्या माध्यमातून आशीर्वाचनाची पर्वणी मिळणार आहे. लि. गुरु निरंजन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पावन समाधीस लघु व महारुद्र अभिषेक सामूहिक इष्टलिंग महापूजा आणि भव्य शिव दीक्षा सोहळ्यामध्ये भाविकांनी सहभागी व्हावे आणि दर्शन व आशीर्वाचनाचा लाभ हिरेमठ संस्थानच्या वतीने करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या