पोलीस मित्र संघटनेच्या सदस्या मीनाक्षी डोंगरे यांचा जॅकेट देऊन गौरव


 पोलीस मित्र संघटनेच्या सदस्या मीनाक्षी डोंगरे यांचा जॅकेट देऊन गौरव


ओसा प्रतिनिधी |


पोलीस मित्र संघटना, नवी दिल्लीच्या सदस्या सौ. मीनाक्षी डोंगरे यांना संघटनेचे अधिकृत जॅकेट प्रदान करून त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी शिवशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादा कोपरे, देविदास राव मोहिते, रामभाऊ शिंदे तसेच पत्रकार राम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी सौ. मीनाक्षी डोंगरे यांचे अभिनंदन करत समाजहित आणि जनजागृतीच्या कार्यात अधिक जोमाने योगदान देण्याचा विश्वास व्यक्त केला.


कार्यक्रमात सामाजिक ऐक्य, जनसेवा आणि पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून नागरिक व पोलीस यांच्यात समन्वय वाढविण्याच्या कार्यावर उपस्थितांनी भर दिला. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छांसह कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या