औसा: नूतन नगरसेवक खुंदमीर मुल्ला व रफीक मुगले यांचा नवी पेठ येथे नागरी सत्कार

 औसा: नूतन नगरसेवक खुंदमीर मुल्ला व रफीक मुगले यांचा नवी पेठ येथे नागरी सत्कार






जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही; नूतन नगरसेवकांचा निर्धार

औसा (प्रतिनिधी):

औसा नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 व १० मधून दैदीप्यमान विजय मिळवल्याबद्दल नूतन नगरसेवक खुंदमीर मुल्ला व रफीक मुगले यांचा नवी पेठ येथे जाहीर सत्कार करण्यात आला. नियमात लोहारे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही लोकप्रतिनिधींचा शाल आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.

प्रभाग क्रमांक 9 व  १० मधील मतदारांनी खुंदमीर मुल्ला आणि रफीक मुंगले यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि नूतन सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी नवी पेठ परिसरात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

जबाबदारीने काम करण्याचा निर्धार

सत्काराला उत्तर देताना खुंदमीर मुल्ला व रफीक मुंगले म्हणाले की, "हा विजय आमचा नसून प्रभागातील जनतेचा आहे. मतदारांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याला तडा जाऊ न देता प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. येणाऱ्या काळात प्रलंबित प्रश्न सोडवून अधिक जबाबदारीने काम करण्याचा आमचा मानस आहे."


यावेळी भिकन मुंगले, लतीफ मैंद, बाबुभाई लोहारे, मज्जीद हलसींगे, जमील बोरफले, बब्बु मैंद, ॲड. तमीम लोहारे, शफी मुंगले, शफीक हलसिंगे, शकील मणियारी, खुनमीर हन्नुरे, वसीम मुंगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नूतन नगरसेवकांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या