दुष्काळी जीआरची होळी! औशात उध्दव ठाकरे गटाचा हल्ला बोल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे औसा येथे आंदोलन
औसा | प्रतिनिधी
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज औसा तहसील कार्यालयासमोर शासनाने काढलेल्या दुष्काळी जीआरची होळी करण्यात आली.
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, भूमिहीन शेतमजूर, रोजंदारी कामगार, पशुपालक तसेच गोरगरीब कुटुंबांनाही दुष्काळी मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शासनाच्या दुष्काळी निर्णयाविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशा ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव, महिला जिल्हाप्रमुख जयश्रीताई उटगे, जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, औसा शहरप्रमुख सुरेश दादा भुरे, युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख तथा पदवीधर तालुका समन्वयक विशाल पवार वाघोलीकर यांच्यासह आजार सावकार, बाबा भाई बागवान, जावेद सडकवाले, शिवाजी पाटील, बाबू सावकार, सुधाकर मुगळे, भागवत लांडगे, सोमनाथ उमरदंड, विठ्ठल बर्डे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

0 टिप्पण्या