जी एम मोबाइल केअर अँड इलेक्ट्रॉनिक्सचा दिवाळी ‘मेगा लकी ड्रॉ’ उत्साहात संपन्न!
विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप; शहरवासीयांचा उत्साह शिगेला
औसा । (प्रतिनिधी) –
जी एम मोबाइल केअर अँड इलेक्ट्रॉनिक्सतर्फे आयोजित करण्यात आलेला दिवाळी मेगा धमाका लकी ड्रॉ सोहळा रविवार, दि. सात डिसेंबर दोन हजार पंचेवीस रविवार रोजी दुपारच्या सत्रात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. संचालक अकबर मणियार आणि अफजल मणियार यांच्या संकल्पनेतून हा भव्य आणि पारदर्शक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
यावर्षीच्या लकी ड्रॉमध्ये ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक बक्षिसांची लयलूट ठेवण्यात आली होती. यामध्ये पाच इस्त्री, एक वॉशिंग मशीन, एक एलईडी टीव्ही, दोन सायकल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोन इलेक्ट्रिक बाईक अशा विविध महत्त्वपूर्ण वस्तूंचा समावेश होता.
ड्रॉ प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी, सर्व सहभागी ग्राहकांच्या चिठ्ठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आल्या. यामुळे ग्राहकांनी या आयोजनावर समाधान व्यक्त केले.
यावेळी या लकी ड्रॉ सोहळ्यात पहिला लकी ड्रॉ तौफिक शेख यांना इलेक्ट्रिकल बाईक लागली,व दुसरा लकी ड्रॉ महादेव पवार चिंचोली यांना इलेक्ट्रिक बाइक लागली,व तिसरा लकी ड्रॉ सिद्धांत बोळके यांना एल ईडी टिव्ही यांना लागली,चौथा लकी ड्रॉ वाशिंग मशिन फैय्याज खुदबोद्दीन शेख यांना लागली,पांचवा लकी ड्रॉ सायकल सादिक शेख यांना लागली, सहावा लकी ड्रॉ अजुन एकाला लकी ड्रॉ मध्ये सायकल लागली आहे.त्यानंतर सात,आठ,नऊ ,दहा व अकरा नंबर यांना लकी ड्रॉ मध्ये इस्त्री लागली आहे.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे, औसा पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवदकर, शेतकरी संघटनेचे राजीव कसबे, तसेच खुंदमीर मुल्ला, खाजाभाई शेख, मेहराज शेख, अविनाश टिके, गोविंद जाधव, मुस्तफा इनामदार, पप्पूभाई शेख, बजाज कंपनीचे करीम शेख, बजाज फायनान्सचे आसिफ शेख, मतीनभाई आणि लकी ड्रॉ समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी लकी ड्रॉच्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि जी एम मोबाइल केअर अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “अशा प्रकारचे उपक्रम ग्राहकांना प्रोत्साहन देतात आणि व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील नाते अधिक मजबूत करतात.”
जी एम मोबाइल केअर अँड इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या सुचारू आयोजनाद्वारे पुन्हा एकदा शहरवासीयांना आनंददायी वातावरण देत ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे.


0 टिप्पण्या