रत्न बुद्धविहारात 'महामानवास विनम्र अभिवादन': महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व 'समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता' - उद्धव लोंढे

 त्रिरत्न बुद्धविहारात 'महामानवास विनम्र अभिवादन': महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व 'समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता' - उद्धव लोंढे



 

औसा (प्रतिनिधी): समता नगर येथील त्रिरत्न बुद्धविहारात महामानवास विनम्र अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी बोलताना बौद्धाचार्य उद्धव लोंढे यांनी महामानवांच्या व्यक्तिमत्त्वाची महती सांगताना म्हटले की, "समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता आणि आकाशाची नीलिमा जशी सर्वत्र पसरलेली असते, तसे महामानव महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व पसरलेले असते."

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पा गायकवाड होत्या. अध्यक्ष व बौद्धाचार्य यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. वंदना कार्यक्रमानंतर भिमपदे व धम्मपदे गीतांचा सुंदर गायन कार्यक्रम सादर झाला. यावेळी रावसाहेब सूर्यवंशी यांची विशेष उपस्थिती लक्षणीय ठरली. कार्यक्रमाचे आभार सुरेश सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या