* *रुद्रा स्पोर्टस क्लबचा विभागात डंका*

औसा प्रतिनिधी 

*  रुद्रा स्पोर्ट क्लबच्या सर्वेसर्वा तथा अंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका आशाताई झुंजे पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्यामुळे रुद्रा स्पोर्टस क्लब लातूरचे तब्बल 9 (नऊ) खेळाडूंनी विभागीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून छत्रपती संभाजी नगर( औरंगाबाद) येथील गारखेडा स्टेडियमवर होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी आपली निवड सिद्ध केलेली आहे.त्यामध्ये U 14 वयोगटातून - आरध्या बडे,चित्रा रायते,आणि काव्या जाकोटिया 

* U 17-वयोगटातून मुले- चि.अनुराग सावंत

* U17 वयोगटातून मुली -

कु. दुर्गा सेलूकर, कु.आदिती पाचपिंडे,कु.पृथ्वी भोसले.

U19 -वयोगटातून-मुले - ओम सेलूकर, मुली - माया पाचपिंडे.

     या तब्बल नऊ विद्यार्थांनी लातूर विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी आपली निवड सिद्ध केल्याने 

रुद्रा स्पोर्टस क्लबच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.रुद्रा स्पोर्ट्स क्लबच्या एकूण नऊ खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

       या सर्व खेळाडूंना क्लबच्या संचालिका तथा आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षिका आशाताई झुंजे पाटील,ज्येष्ठ विधिज्ञ तथा योगा असोशिशनचे अध्यक्ष मा. श्री.महादेवजी झुंजे पाटील,मलखांब तथा योगा प्रशिक्षक तसेच योगा असोसिएशनचे सहसचिव मा.श्री.रामलिंगजी बिडवे सर,सागर करे सर,योगेश पंडीत,कपील झुंजे,सुषमा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.