मला एक मत द्या मी तुमचा सेवक म्हणून उभा राहिन-सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 मला एक मत द्या मी तुमचा सेवक म्हणून उभा राहिन-सय्यद मुजफ्फर अली इनामदार 




 औसा प्रतिनिधी 


औसा नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून ग्रॅस सिलेंडर या चिन्हावर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या प्रचाराला स्थानिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सभेची प्रभागात जोरदार चर्चा रंगली आहे.


प्रभागातील कटगर गल्ली, आवटी वाडा, नवी पेठ, संभाजीनगर अशा भागांमध्ये दारोदारी भेटी देत इनामदार यांनी मतदारांशी मनमोकळा संवाद साधत भावनिक आवाहन केले आहे. “पैशाकडे न पाहता माझ्याकडे बघा, कामाकडे बघा आणि मला एक मत द्या”,  मी तुमचा सेवक म्हणून उभा राहिन असे आवाहन त्यांनी सभेत करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.


जलाल शाही चौक येथे आयोजित प्रचार सभेत ते म्हणाले, “तुमचा दिलेला एक मत माझ्यासाठी फक्त मत नाही, ती मोठी जबाबदारी आहे. पुढची पाच वर्षे मी तुमचा सेवक म्हणून काम करण्यास तयार आहे.” प्रभागातील मूलभूत अडचणी सोडवण्याची प्रामाणिक तयारी व्यक्त करताना त्यांनी कोणतीही अवास्तव आश्वासने न देता प्रामाणिकतेचा आग्रह धरला.


“मी पैशाची सत्ता, पक्षाची सत्ता किंवा दिखाऊ शक्ती घेऊन आलो नाही. माझ्या कामासह, प्रामाणिकतेसह आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने आलो आहे,” असे म्हणत इनामदार यांनी मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला.


या सभेला सद्दाम पठाण, असलम इनामदार, मोईज इनामदार, मुजक्कीर इनामदार, संजीव शिंदे, व्यंकट जाधव, शेख मन्नान यांसह प्रभागातील अनेक मतदार उपस्थित होते. साधेपणा आणि सरळ भाषणामुळे इनामदार यांच्या प्रचाराची चर्चा प्रभागात चांगलीच जोर धरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या