भारतीय जनता पार्टीच्या काळातच अल्पसंख्याकांना सर्वाधिक योजना मिळाल्या- इद्रीस मुलतानी

 भारतीय जनता पार्टीच्या काळातच अल्पसंख्याकांना सर्वाधिक योजना मिळाल्या-  इद्रीस मुलतानी 



औसा प्रतिनिधी 


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली शासनाच्या सर्वाधिक योजनांचा लाभ अल्पसंख्यांक बांधवापर्यंत पोचविण्याचे कार्य भारतीय जनता पार्टीने प्रामाणिकपणे केले असे प्रतिपादन  इद्रीस मुलतानी यांनी केले औसा येथे नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अभिमन्यू पवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर ज्योतीताई बनसुडे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार बाजपाई ,युवा नेते सुनील उटगे,  वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी,सोमनाथ इळेकर, अक्रम खान पठाण, पप्पुभाई शेख, इम्रान सय्यद, फेरोज पठाण,निसार कुरेशी,लिंबराज जाधव महिला आघाडीच्या कल्पनाताई  डांगे, सुवर्णा नाईक, शहराध्यक्ष शिवरुद्र मुर्गे, यांच्यासह नगरपरिषद सदस्य पदाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. पुढे बोलताना इद्रिस मुलतानी म्हणाले की भारतीय जनता पार्टीला जातीयवादी पक्ष म्हणून नावे ठेवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांक समाजाचा मोठा घात केला आहे शासनाच्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत कधीच पोहोचू दिल्या नाहीत लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या मनात भीती पसरवून खोटा निगेटिव्ह निर्माण करीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास मुस्लिम समाजाला जगणे मुश्किल होईल असा गल्लोगल्ली विषारी प्रचार केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण केला. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यांमध्ये विविध स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक समाजाला प्रतिनिधित्व दिले असून आमदार अभिमन्यू पवार यांनीही औसा नगर परिषदेमध्ये सात अल्पसंख्यांक उमेदवार देऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वाधिक योजनांचा लाभ मुस्लिम अल्पसंख्यांक समाज बांधवांना मिळत आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल योजना ,उज्वला गॅस योजना, लाडके बहीण योजना, स्वस्त धान्य दुकानातील मोफत अन्नधान्य योजना, मुद्रा आणि कौशल्य विकास योजनेतून तरुणांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत मोफत औषधोपचाराच्या कितीतरी लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून याचा सर्वाधिक लाभ अल्पसंख्यांक समाजबांधवांनाच मिळत असल्याचे आपण पाहतो काँग्रेस पक्षाने वर्षानुवर्ष जातीयता निर्माण करून अल्पसंख्याकांना भारतीय जनता पार्टी पासून दूर ठेवण्याचा चालविलेला प्रयत्न हाणून पाडण्याची आज गरज निर्माण झाली आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना या कोणतीही जात किंवा धर्म पाहून दिल्या जात नसतात हे अल्पसंख्यांक बांधवांनी लक्षात ठेवले पाहिजे गावा गावाला जोडणारी रस्ते गावातील अंतर्गत रस्ते नाल्या पाणीपुरवठा योजना विविध शासकीय कार्यालयातील सुसज्ज इमारती नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात शेती विकासाला चालना देण्यासाठी सुलभ कर्ज योजना, भारतीय जनता पार्टीच्या काळात अत्यंत पारदर्शीपणे राबविल्या जात असून शासकीय योजनेचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत मधल्या यंत्रणेत होणारा भ्रष्टाचार रोखण्याचे महान कार्य केले आहे. श्रावण बाळ योजना संजय, गांधी निराधार योजना, लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा विविध योजने सहशालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून युवकांना कर्ज पुरवठा यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाला चालना मिळाली आहे असे सांगून आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघासह शहरात कोट्यावधी रुपयाची केलेली विकास कामे आणि सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन करीत असलेले विकासाची धडपड ही कौतुकास पात्र ठरणारे आहे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. औसा येथील निलंगा वेशी जवळ आझाद चौक येथे आयोजित विराट सभेत भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे हजारो कार्यकर्ते व विराट जनसमुदाय तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर ज्योतीताई बनसोडे आणि आमदार अभिमन्यू पवार तसेच इद्रिस मुलतानी यांनी औसा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह 23 उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड फिरोज खान पठाण यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या