प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार मुजफ्फर अली इनामदार यांची फेरी पूर्ण...

 प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार मुजफ्फर अली इनामदार यांची फेरी पूर्ण...



औसा प्रतिनिधी 

 औसा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार सय्यद मुजफ्फर आली इनामदार यांनी गॅस सिलेंडरच्या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत प्रभाग क्रमांक 10 मधील कटगर गल्ली ,आवटी वाडा, नवी पेठ, संभाजीनगर या भागातील घराघरात त्यांनी आपल्या निवडणूक चिन्हासह जाहीरनाम्याच्या प्रति पोहोच केल्या आहेत. सय्यद मुजफ्फर अली इनामदार हे सातत्याने जनतेच्या प्रश्नासाठी शासन दरबारी निवेदन देऊन प्रशासनाला वेटीश धरण्याचे कार्य करीत असतात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने धडपड करणारे आणि औसा शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या आशीर्वादाने आपणास संधी मिळाल्यास नगर परिषदेमध्ये आपण प्रभागातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा देऊन जनतेच्या विश्वासाला पात्र राहून काम करीत राहू असे आश्वासन दिले आहे. प्रचाराची एक फेरी त्यांनी पूर्ण केली असून  त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या