जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकाकडून औसा शहरातील मतदान केंद्र स्ट्रॉगरूम मतमोजणी ठिकाणांची पाहणी
संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राना भेटी
औसा प्रतिनिधी
औसा : औसा नगरपरिषदेच्या
निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून या नगरपरिषदेच्या स-ार्वत्रिक निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी औसा शहरातील मतदान केंद्र स्ट्रॉग रूम मतमोजणी तसेच शहरातील संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी केली.
औसा शहरातील निवडणूक विषयक सर्व सुरक्षा व्यवस्था
मतदान केंद्राची उपलब्ध सुविधा सीसीटीव्ही व्यवस्था पाण्याची सोय विद्युत सुविधा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना याचा सविस्तर आढावा यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी घेतला. मतदान केंद्राच्या ठिकाणी माहिती घेत निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासन व पोलीस अधिक-यांना देण्यात आल्या. तसेच मतदान पा-रदर्शक शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे
करण्याचे निर्देश दिले.
दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या वेळात औसा शहरातील सर्व मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. यावेळी जिल्हा सह आयुक्त अजितकुमार डोके तहसीलदार तथा निवडणूक
निर्णय अधिकारी घनश्याम अडसूळ औसा न.प. चे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी पोलीस निरीक्षक आर के डमाले व निवडणूक प्रक्रिया पाहणारे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0 टिप्पण्या