प्रभाग १० अ मध्ये अपक्ष उमेदवार सय्यद मुजफ्फरअली इनामदार रिंगणात!
जनतेची सेवा करण्याची संधी द्या; 'गॅस सिलेंडर' समोरील बटन दाबण्याचे आवाहन
औसा प्रतिनिधी
औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक 10 अ मधून इनामदार सय्यद मुजफ्फरअली हाशमअली यांनी अपक्ष उमेदवार म्हणून जोरदार एंट्री घेतली आहे. जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी मतदारांना निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना, उमेदवार इनामदार सय्यद मुजफ्फरअली हाशमअली यांनी मतदार बंधू-भगिनींना विनंती केली आहे की, "आपण फक्त येणाऱ्या दोन तारखेला (2/12/2025) रोजी त्यांच्या निवडणूक चिन्हाच्या, म्हणजेच गॅस सिलेंडर समोरील एक क्रमांकाचे बटन दाबून त्यांना प्रचंड अशा मताने विजयी करावे."
जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची संधी मिळावी, या इच्छेने त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 क्रमांक प्रभागातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्यास, प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते समर्पित भावनेने काम करतील, अशी ग्वाही सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या