मोमीन समाज जबान का पक्का -अभिमन्यू पवार

 मोमीन समाज जबान का पक्का -अभिमन्यू पवार 



औसा प्रतिनिधी 

औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025  च्या पार्श्वभूमीवर भाजपा -शिवसेना युतीचा नगराध्यक्षा पदासाठी डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे व वार्ड क्रमांक. ९ मधील सदस्य पदासाठी फातेमा उमर पंजेशा व जितेंद्रप्पा इळेकर यांच्या प्रचारार्थ मोमीन गल्ली औसा येथे 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजता कॉर्नर बैठक  घेण्यात आली.या बैठकीत  आमदार  अभिमन्यु पवार म्हणाले मी आमच्या तिन्ही उमेदवारांना भरपूर शुभेच्छा देतो. याठिकाणी दिसते एक परिवर्तनाची लाट आहे, परिवर्तन होणारच आणि आमच्या कल्पना ताई म्हटल्याप्रमाणे हिच वेळ आहे अभी नहीं तो कभी नही.मला येताना सदाभाऊ नी सांगितले मोमीन समाज जबान का पक्का आहे .आणि मोमीन समाजाचा एक ही मत इकडं तिकडं जात नाही फक्त कमळ कमळ.आता मला ते बघायचं आहे.  परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे तर आमच्या भाजपाचे नगराध्यक्षा पदासाठी डॉक्टर ज्योती महादेव बनसुडे व सदस्य पदासाठी फातेमा उमर पंजेशा व जितेंद्रप्पा इळेकर याना  निवडून द्यायचे आहे मत भूल कमल का फूल कमल कमल कमल असे या प्रसंगी कॉर्नर बैठकीत बोलताना सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.या कॉर्नर बैठकीत मोमीन समाजाचे अब्दुल गणी करपुडे यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात आज रोजी प्रवेश केले आहे.यावेळी या कॉर्नर बैठकीत भारतीय जनता पार्टीचे किरण उटगे, संगमेश्वर ठेसे, अक्रमखां पठाण, जब्बार करपुडे, अब्दुल गणी करपुडे, सदानंद शेटे,उमर पंजेशा, जितेंद्रप्पा इळेकर,फारुख पटेल, कल्पना ताई डांगे,आणि मोमीन समाजाचे बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या