डॉक्टर अफसर शेख यांच्यामध्ये धमक आहे राष्ट्रवादीच्या हाती सत्ता द्या विकासाची जबाबदारी माझी- अजित पवार
औसा प्रतिनिधी
औसा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अक्षर शेख यांनी मागील अनेक वर्षापासून अवश्य शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिले आहेत. ऐतिहासिक मराठा भवन स्पर्धा परीक्षा केंद्र, आठवडी बाजार शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक कामाच्या माध्यमातून आपल्या कामाची धमक दाखवलेली आहे. येणाऱ्या काळात औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाची जबाबदारी मी घेतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी किल्ला मैदान औसा येथे आयोजित विराट सभेत स संबोधित केले, पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की पाऊस आहे ऐतिहासिक शहर असून सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे येथील महाशिवरात्रीचा उत्सव आणि पुरुष सारखे उत्सव सर्वधर्म बांधव सहभागी होऊन आनंदाने साजरा करीत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष त्याचा पुरस्कर्ता असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे. डॉक्टर अफसर शेख हे सर्वसामान्य जनतेच्या नेहमी सुख दुःखामध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांच्या वाट्याला प्रेम आले आहे. स्वर्गीय एनबी शेख यांचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे आपल्या मिळालेल्या पदाचा सदुपयोग त्यांच्या हातून नेहमीच होत आलेला आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून या अशा निवडणुकांच्या माध्यमातून कार्यकर्ता बळकट होत असतो म्हणून येणाऱ्या काळात औसा शहराच्या विकासाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझ्या वतीने तसेच राज्य सरकार केंद्र सरकार सह सी एस आर फंडामध्ये आमच्या संपर्क असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराट जनसमुदायाला दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रवीण नवबुद्दीन शेख यांच्यासह 23 सदस्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रारंभी डॉक्टर अफसर शेख यांनी प्रास्ताविकातून आपण केलेल्या कामाची माहिती विशद केली माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही समायोजित भाषणे झाली. या विराट सभेच्या व्यासपीठावर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मकरंद सावे, अँडव्होकेट श्रीकांत सूर्यवंशी, दत्तात्रय कोळपे, बबन भोसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परविन शेख, मौलाना कलीमुल्ला, जावेद शेख, खुंदमीर मुल्ला,मुजाहेद शेख,मेहरज शेख अविनाश टिके, गोविंद जाधव,अमर रेड्डे, मुकेश तोवर, रुपेश दुधनकर, किर्ती ताई का़बळे,वैशाली नारायणकर यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या