अलुरे-करपुडे विवाह सोहळा उत्साहात संपन्न;

 अलुरे-करपुडे विवाह सोहळा उत्साहात संपन्न; 



हैदराबाद: औसा  येथील जिलानी उर्फ खाजाभाई अलुरे यांचे चिरंजीव मुस्तफा आणि हैदराबाद येथील नियामत करपुडे यांची कन्या मेहराज बानो यांचा विवाह सोहळा  (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 7 वाजता मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

हैदराबाद येथील रहमतीया हॉल येथे हा विवाह सोहळा पारंपरिक विधी आणि सौहार्दाच्या वातावरणात संपन्न झाला.

या मंगलप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी दोन्हीकडील नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदांपत्यास सुखी आणि यशस्वी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या