आम आदमी पार्टी औसा नगरपरिषद निवडणूक लढवणार- जिल्हाध्यक्ष अश्विन नलवले

 आम आदमी पार्टी औसा नगरपरिषद निवडणूक लढवणार- जिल्हाध्यक्ष अश्विन नलवले 



औसा प्रतिनिधी 


आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेच्या सहकार्याने लोकसभेसह अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढवली आहे. यावेळी आमचा पक्ष प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सक्षमपणे लढवणार असून औसा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 23 जागेवर उमेदवार उभे करणार अशी माहिती अश्विन नलवले जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. तळागाळातील जनतेच्या प्रश्नासाठी तसेच वाढती महागाई आणि देशातील भ्रष्टाचाराचा विरोधात अनेक वेळा आंदोलन करून जनतेचे लक्ष वेधले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे पंजाब राज्यात हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणूक करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतून सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी या हेतूने आम आदमी पार्टी औसा शहरातील नगरसेवक पदाच्या सर्व जागा लढविणार असल्याचे  त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस आकाश मोठे राव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या