श्री नेताजी सावंत यांची 'मुप्टा' संघटनेच्या औसा तालुकाध्यक्षपदी निवड ..................................................................
औसा प्रतिनिधी..........
आज लातूर येथील अंजना हॉटेलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा) संघटनेच्या कार्यकारिणीत श्री.नेताजी माणिकराव सावंत यांची औसा तालुकाध्यक्ष माध्यमिक विभाग पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या विस्तारासाठी त्यांनी आजवर केलेले कार्य त्यांचा प्रामाणिक व सातत्यपूर्ण सहभाग लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या पदाच्या माध्यमातून त्यांना औसा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून,त्यांना संघटना विस्तारासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.संघटनेचे संस्थापक सचिव प्रा.सुनिल मगरे सर आणि विभागीय अध्यक्ष डॉ.संभाजी वाघमारे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अंकूशजी नाडे सर,विभागीय कार्याध्यक्ष डॉ.भास्कर टेकाळे सर, लातूर जिल्हाप्रमुख प्राध्यापक मकबुल शेख सर, मुप्टा उर्दू प्रदेशाध्यक्ष डॉ. समीउल्ला खान,कनिष्ठ महाविद्यालयीन विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बलभीम सातपुते सर, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज मुसांडे सर,प्राध्यापक बाबासाहेब कांबळे सर, प्राध्यापक प्रकाश कांबळे सर,प्राध्यापक जोपळे सर, प्राध्यापक हावळे सर,श्री मनोज घोडके सर श्री तुरेवाले सर,तसेच तालुका, जिल्हा व विभाग पातळीवरील सर्व पदाधिकारी,प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्राध्यापक बलभीम सातपुते सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रकाश कांबळे सर यांनी केले.

0 टिप्पण्या