अज्ञात वाहनाच्या धडकेत बहीण भावाचा जागीच मृत्यू
औसा/प्रतिनिधी -
औसा तालुक्यातील वाघोली येथील शिंदे कुटुंबावर काळाने झडप घातली असून दुर्दैवी अपघातामध्ये पद्माकर शिंदे यांचा मुलगा आणि मुलगी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वाघोली येथील प्रसाद पद्माकर शिंदे आणि गायत्री पद्माकर शिंदे हे बहीण भाऊ वाघोली येथून लातूरकडे मोटार सायकल वरून फॉर्म भरण्यासाठी जात असताना औसा येथील नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर दिल्यामुळे मोटरसायकली देवयानी साडी सेंटरच्या समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मोटरसायकली
वरून पडले व पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोघांनाही चिरडल्यामुळे बहिण भाऊ जागीच गतप्राण झाले. ही घटना मंगळवार दि ७ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळाचा पंचनामा करून शविच्छेदन केल्यानंतर
नातेवाईकांच्या ताब्यात दोन्ही प्रेत देण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोघांचाही वाघोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आला या घटनेमुळे संपूर्ण वाघोली गावावर शोककळा पसरली आहे.

0 टिप्पण्या