लातूरच्या विकासासाठी केंद्र सरकारकडे 10 प्रमुख मागण्या
– अर्चना ताईंना पाठपुरावा करण्याची विनंती
लातूर: लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या दहा महत्त्वाच्या मागण्या तातडीने मंजूर करून घेण्यासाठी भाजप नेत्या मा. अर्चना ताई पाटील चाकूरकर यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष आकाश कांबळे व उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी यासंदर्भातील निवेदन अर्चना ताईंना दिले. यामध्ये नवीन रेल्वे मार्ग, वाढीव रेल्वे सेवा, आकाशवाणी केंद्र, विमानतळाचा विकास, आणि रिंग रोड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विकासकामांचा समावेश आहे.
लातूरसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहराच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी या सर्व मागण्या अत्यंत आवश्यक आहेत, असे मत संघाने व्यक्त केले आहे.
जिल्ह्याच्या प्रगतीसाठी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने केंद्र सरकारकडे केलेल्या 10 प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: विकासाची मागणी उद्देश व महत्त्व
लातूर रोड – नांदेड नवीन रेल्वेमार्ग (वाया अहमदपूर, लोहा) मराठवाडा कनेक्टिव्हिटी वाढेल. लातूर रोड – बोधन नवीन रेल्वेमार्ग तेलंगणा राज्याशी संपर्क सुधारेल.
लातूर – कलबुर्गी नवीन रेल्वेमार्ग (वाया औसा, आळंद) कर्नाटक राज्याशी जोडणी मजबूत होईल.
लातूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म 3 व 4 ची निर्मिती वाढत्या गाड्यांसाठी स्थानकाची क्षमता वाढेल. लातूर – पुणे इंटरसिटी (सकाळची) नवीन रेल्वे सेवा पुणे प्रवाशांसाठी सकाळच्या वेळेत सोयीची सेवा.
लातूर आकाशवाणी केंद्र व एफ. एम रेडिओ स्टेशन स्थानिक कला, संस्कृती व माहितीच्या प्रसारासाठी.
कोविडपूर्वीची पुणे-हैदराबाद रेल्वे सेवा पुन्हा सुरू करणे महत्त्वाच्या महानगरांशी संपर्क पूर्ववत होईल.
लातूर विमानतळाचा विकास व विमानसेवा सुरू करणे हवाई मार्गाने व्यापार आणि प्रवासाला चालना.
लातूर रोड – कुर्डुवाडी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण | रेल्वे वाहतुकीचा वेग व क्षमता वाढेल.
लातूर शहरासाठी नवीन रिंग रोड (बाह्यवळण रस्ता) शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल व मालवाहतूक सुलभ होईल. पाठपुराव्याची विनंती
लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने मा. अर्चना ताई पाटील चाकूरकर यांना आवाहन केले आहे की, त्यांनी या मागण्यांना केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून द्यावी. जेणेकरून या विकासकामांना गती मिळेल आणि लातूर जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल.

0 टिप्पण्या