पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी - तहसिलदार घनश्याम अडसूळ

 पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करून घ्यावी - तहसिलदार घनश्याम अडसूळ



औसा/प्रतिनिधी


मा. भारत निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी नव्याने पदवीधर मतदार नोंदणी करण्यात तुरु आहे आहे. दि.३० सप्टेंबर पासून मतदार नोंदणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. दि.६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. औस तालुक्यातील पात्र पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करुन घ्यावी, नोंदणीसाठीचे अर्ज तहसिल कार्यालय औत्ता


येथील फॉर्म स्वीकृती कक्षामध्ये अर्ज वाटप व स्विकृती सुरू आहे असे आवाहन तहसिलदार घनश्याम अडसूळ यांनी केले आहे. ते म्हणाले, की भारत निवडणूक आयोगाचे दि. १२ सप्टेंबर २०२५ चे पत्रान्वये दि १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. बुधवारी, १५ ऑक्टोंबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३९ (४)


अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुनप्रसिध्दी करण्यात येणार आहे. शनिवार २५ ऑक्टोंबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची व्दितीय पुनप्रसिध्दी करण्यात येणार आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबर रोजी नमुना १८ किंवा १९ व्दारे दावे/अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिवस असणार आहे. गुरुवार दि. २० नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई, मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी, दि. २५ नोव्हेंबर ते दि. १० डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात


येणार आहेत. गुरुवारी, दि.२५ डिसेंबर रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे, मंगळवारी, दि.३० डिसेंबर रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे,


पदवीधर मतदार संघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे वा मतदारसंघातील सध्या अस्तित्वात असलेल्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व व्यक्तींनी सुध्दा विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करावा, असे आवाहन तहसिलदार घनश्याम अडसूळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या