समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणे हेच एमआयएमचे ध्येय- फिरोज लाला
औसा प्रतिनिधी
एम आय एम हा पक्ष 80 टक्के समाजकारण आणि 20% राजकारण करीत समाजातील शोषित पीडित उपेक्षित दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजाला सोबत घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम करणारा पक्ष आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून कार्य करणे हेच पक्षाचे ध्येय आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे लातूर जिल्हा निरीक्षक फिरोज लाला यांनी व्यक्त केली. औशातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत संबोधित करताना ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष सर्व शक्तीनिशी लढणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी यांनी विरोधी पक्षाला मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे.निवडणूक आयोग आणि शासकीय यंत्रणेवर दबाव तंत्राचा वापर करून सामान्य जनतेचा व विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्यावी यासाठी एमआयएम पक्षाने सर्वात आधी मागणी केली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील गोरगरिबांना न्याय देत संघटन मजबूत करणे आवश्यक आहे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी एआयएमआयएम (AIMIM) पक्षाचे माजी मराठवाडा अध्यक्ष, सरचिटणीस तथा लातूर जिल्हा निरीक्षक फिरोज खान लाला, मराठवाडा जनरल सेक्रेटरी अब्दुल बशीर माजीद, माजी नगरसेवक सय्यद ताहेर भाई, जिल्हाध्यक्ष महंमदअली शेख, तालुका अध्यक्ष ॲड गफुरऊल्ला हाश्मी, शहर अध्यक्ष सय्यद कलीम, अफसर शेख, शकील देशमुख, सय्यद जमिरोद्दीन, अतिख पठाण, शफीक शेख, असलम नवाब, रहीम तांबोळी, बाबा पटेल, इमरान बागवान, तोहीद पटेल, जुनेद शेख सरफराज पठाण,चांद भाई लोणे, रशीद
भाई बागवान यांच्यासह आदी जण उपस्थित होते.

0 टिप्पण्या