अमर खानापुरे यांच्या पुढाकाराने औसा विकासार्थ कॉग्रेसचा जनसंवाद

 अमर खानापुरे यांच्या पुढाकाराने औसा विकासार्थ कॉग्रेसचा जनसंवाद







..

औसा प्रतिनिधी

औसा, १९ ऑक्टोबर २०२५:

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने "विचारमंथन, सुसंवाद आणि स्नेहसंमेलन" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पवन गणेश मंदिर, प्राध्यापक कॉलनी, औसा येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अमर अशोक खानापुरे हे होते. 

आगामी औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शहर विकासासाठी नागरिकांशी थेट जनसंवाद साधला. काँग्रेसचे नेते अमर खानापुरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या विशेष कार्यक्रमात औसा शहरातील विविध क्षेत्रांतील आणि समाजातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यात शहरातील बूध्दिजीवी, पत्रकार संघ, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी 

 यावेळी आपली मते मांडली.

या संवादात औसा शहराच्या भविष्याच्या विकासाच्या वाटचालीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले. नागरिकांकडून विकासाचे अनेक विषय समोर आले. निवडणुकीच्या निमित्ताने सकारात्मक राजकारण व्हावे आणि धार्मिक सलोखा वाढावा, यावर विशेष भर देण्यात आला.

समोर आलेल्या सर्व विकासविषयक मागण्यांना न्याय देण्याच्या दिशेने काँग्रेस पक्षाची वाटचाल असेल, असे आश्वासन यावेळी पक्षाकडून देण्यात आले. औसाच्या विकासासाठी जन-आधारित कृती कार्यक्रम निश्चित करण्याची तयारी काँग्रेसने या संवादातून दर्शवली आहे.

या कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या